६२ व्या वर्षी एका महिलेने दूध डेरीचा बिझनेस सुरु करुन उभी केली करोडीची कंपनी – Navalben Choudhary Success Story

Priyanka
4 Min Read

Navalben Choudhary Success story मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि बिझनेस करायला कोणत्याही वयाची किंवा शिक्षणाची अट नसते. स्वतःमध्ये काही करण्याची इच्छा आणि अनुभव असेल. तर आपण मेहनत करून कोणत्याही वयात कधीही स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. आज आपण अश्याच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत.

वय ६२ वर्ष हे असं वय आहे कि ह्या वयात खूप जण घरी बसतात. त्यांना नवीन काही करण्याची इच्छा नसते. कारण हे वयच असे आहे कि लोक ह्या वयात आपलं काम सोडून रेईटायरमेंट घेतात. परंतु आज आपण अश्याच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. जिने वयाच्या ६२ व्या वर्षी फक्त दूध विकून स्वतःचा बिझनेस सुरु केला. चला तर मग जाणून घेऊया Navalben Choudhary Success story

Navalben Choudhary Success story  – कोण आहे नवलबेन चौधरी ?

नवलबेन चौधरी ह्या गुजरात शहरामधील छोटस गाव असलेल्या नगला खेड्यात राहतात. ६२ वर्ष त्याचं वय आहे. नवलबेन चौधरी ह्या महिलेने वयाच्या ६२ व्या वर्षी स्वतःचा दूध डेरी चा बिझनेस चालू केला. ह्या वयात लोक रिटायरमेंट घेऊन घरी बसतात. त्या वयात स्वतःच बिझनेस चालू करून त्यांनी सगळ्यांसमोर एक खूप चांगलं उदाहरण निर्माण केलं. नवलबेन चौधरी ह्या दूध डेरीचा बिझनेस करून महिन्याला लाखो रुपये कमावते.

Navalben Choudhary Success Story – वयाच्या ६२ व्या वर्षी चालू केला स्वतःचा बिझनेस

नवलबेन चौधरी हिने वयाच्या ६२ वर्षी स्वतःचा दूध डेरी चा बिझनेस सुरु केला. नवलबेन कडे दूध काढण्यासाठी ४५ पेक्षा जास्त गायी आणि ८० पेक्षा जास्त म्हशी आहेत. त्यांच्या मदतीनुसार त्यांनी पूर्ण गावाला दुधाचा पुरवठा केला. कोणालाही स्वतःचा बिझनेस चालू करायसाठी खूप साऱ्या नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो.
जेव्हा नवलबेन ह्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला तेव्हा खूप लोक त्यांना म्हणायचे कि ह्या वयात बिझनेस चालू करून काय फायदा पण त्यांनी कोणाचं काही न एकता स्वतःवर विश्वास ठेवून लाखो करोडोंचा बिझनेस चालू केला.

नवलबेन ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं कि काही सोशल मीडियांमधून असे माहिती पडले कि नवलबेन ह्यांनी २०२० ते २०२१ ह्या वर्षात दूध विकून १ कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. नवलबेन चौधरी ह्या वर्षाला करोडो तर महिन्याला लाखों रुपये कमावते. त्यांच्या ह्या बिझनेसमुळे भरपूर लोकांना रोजगार सुद्धा मिळाला. सध्या त’त्यांच्या हाताखाली १५-२० जण कामाला आहे.

वयाच्या ६२ व्या वर्षी स्वतःच्या मेहनतीने बिझनेस चालू केल्यामुळे त्यांना तीन वेळा गुजरातमधील बनासकांठा जिल्यामधून सर्वश्रेष्ठ पशुपालक ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल आहे.

नवलबेन चौधरी तरुणांसाठी एक मोटिवेशन

Navalben Chaudhari ह्यांनी तेव्हा बिझनेस चालू केला जेव्हा खूप लोक ६० वर्ष झाले कि सगळ्या कामांपासुन मुक्त होतात. त्यांना काहीच करण्याची इच्छा राहत नाही. मुळात अश्या वयात शरीर साथ देत नाही. ह्या वयात माणसं थकून जातात. पण नवलबेन चौधरी ह्यांनी सिद्ध करून दाखवलं कि वय हा एक फक्त नंबर आहे. मनात इच्छा असेल तर आपण आपल्या अनुभवाने बुद्धीने आणि मेहनतीने वयाच्या कोणत्याही वर्षी आपण बिसनेस चालू करू शकतो. नवलबेन चौधरी तरुणांसाठी एक खूप मोठ मोटिवेशन आहे.

ही बातमी पण वाचा 

Munawar Faruqui Income – YouTube आणि Instagram वर कॉमेडी व्हिडिओ बनवून कमवतो लाखो रुपये

Madhura Bachal Success Story – मधुरा बाचल ते मधुरा रेसिपचा यूट्यूबचा प्रवास

मित्रांनो तुम्हांला आमचा ६२ व्या वर्षी एका महिलेने दूध डेरीचा बिझनेस सुरु करुन उभी केली करोडीची कंपनी – Navalben Choudhary Success Story हा ब्लॉग कसा वाटला comment करुन नक्की सांगा.

Share This Article