Madhura Bachal Success Story – मधुरा बाचल ते मधुरा रेसिपचा यूट्यूबचा प्रवास

Priyanka
5 Min Read

Madhura Bachal Success Story मित्रांनो मधुरा बाचल ते मधुराज रेसेपी पर्यंत हा प्रवास कसा पोहचाल हे आपण पाहूया. मधुरा बाचल ह्या राहायला पुण्याला होत्या. लहान पानापासूनच त्यांचा जीवनाचा प्रवास खूप खडतर होता. त्या पुण्यातील वाडा संस्कृती मध्ये राहत होत्या. जिथे दिवसा ढवळ्या गुंडागर्दी चालायची. पुण्यातील १०० sq फूट च्या घरात त्या राहत होत्या. त्या काळी त्यांची परिस्थती असी होती कि साधं २ वेळचे अन्न खायला मिळत नव्हते. त्या हलाकीच्या परिस्थित सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करता करता त्या पार्ट टाइम जॉब सुद्धा करायच्या. जेणेकरुन थोडासा घराला हातभार लागेल. जस त्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्यांना Multi national कंपनी मध्ये जॉब मिळाला.

Madhura Bachal Success Story

मधुरा बाचल राहणाऱ्या मूळच्या पुण्याचा होत्या. पुण्यातच त्यांचं शिक्षण झालं. आणि त्यानंतर त्या चांगल्या जॉब वर स्थायिक झाल्या. त्यानंतर त्यांच लग्न मंगेश बाचल बरोबर झालं. मंगेश बाचल हे इंजिनीर होते.मधुरा आणि मंगेश बाचल ह्यांचं लग्नझाल्यावर अमेरिकेतील शिकागो ह्या शहरात दोघे स्थायिक झाले.कालांतराने मधुरा बाचल ह्या सुद्धा शिकागो बँकेत नोकरीला लागल्या. नोकरी करत असतांना २००९ मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला.

मधुरा बाचल ह्यांना २००९ मध्ये कन्यारत्न झाल्यानंतर त्या प्रसूती रजेवर गेल्या. त्यानंतर त्यांनी मुलीला पाहण्यासाठी अमिरिकेतला बँकेतला जॉब सोडला. आणि सर्व गृहिणीप्रमाणे त्यांनी आपल्या घराकडे लक्ष द्यायला सुरवात केली. अमेरिकेतला जॉब सोडल्यामुळे मुलीचा सांभाळ करता करता त्यांच्याकडे भरपूर वेळ उरायचा. त्या फावल्या वेळेतच त्या युट्युब वर रेसिपि तयार करणारे व्हिडीओ पाहायच्या. आणि त्या घरी सुद्धा बनवायच्या. युट्युबवर व्हिडीओ पाहता पाहता त्यांना असं लक्षात आलं की इथे पुरणपोळी अस्सल मराठी पदार्थ चे व्हिडिओ जास्त सापडत नाही.

Madhura Bachal Success Story and Success Youtuber

Madhura bachal Success story and success youtuber

मधुराज रेसिपी

Madhura Bachal Success Story यूट्यूब वर मराठी पदार्थाचे व्हिडीओ सापडत नसल्यामुळे तेव्हाच त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी २००९ स्वतःच एक मधुराज रेसिपि यूट्यूब चॅनल चालू केलं. कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना टेकनिकल नॉलेज कमी होत. पण तरीही त्यांनी त्यांच्या घरात असणार डिजिटल कॅमेरा वापरला. घरात असणारे लॅम्प आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर केला. ट्रायपॉड ही त्यांनी त्यांचा मैत्रिणींकडून मागितला. तसेच त्यावेळस त्यांच्याकडे माईक नव्हता. तर आवाज मोठा करून त्या त्यांच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत व्हिडीओ शूट करायच्या. त्यांचं शिक्षण मराठी मधून जरी झालं असलं तरी त्यांना थोडंफार इंग्रजी जमायचं. तर अशाप्रकारे त्यांनी त्यांचं पाहिलं मधुराज रेसिपि चॅनल इंग्रजीत सुरु केलं.

सुरवातीच्या काही काळात त्यांच्या यूट्यूब चॅनल इतका प्रतिसाद येत नव्हता. पण तरीही त्या इथेच न थांबता फावल्या वेळेत व्हिडीओ बनवायच्या. जवळ जवळ तीन वर्षानंतर त्यांचं चॅनल मॉनिटाईझ झालं. त्या इथेच थांबता त्यांनी त्यांचं प्रादेशिक भाषेतल चॅनल २०१२ मध्ये चालू केलं आणि २०१६ मध्ये मधुराज रेसिपि मराठी हे चॅनल चालू केलं. आणि आज ह्या चॅनल चे ३ मिलियन सबस्क्राईबरआहेत.

Madhura bachal Madhura’s recipe reached evey home

Madhura Bachal Success Story मधुरा बाचल ह्या मधुराज रेसिपि चॅनल व यूट्यूबच्या माध्यमांतून सगळ्या घरात पोहचल्या. त्यांनंतर त्यांनी ५ ऑक्टोबर २०१८ साली पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात लोकांसाठी मधुराज रेसिपि च पुस्तक प्रकाशित केलं.त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच त्या इथेच न थांबता त्यांनतर त्यांनी स्वतःच एक पाऊल आणखी पुढे टाकून स्वतःचे मसाले ब्रँड चालू केलं. त्यात बेडगी मसाला, कांदालसून मसाला असे अस्सल मराठी मसाले काढले त्यांचे मसाले हे ऑनलाईन अमेझॉन वर सुद्धा विक्रीसाठी आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद हि मिळत आहे.

मधुरा रेसिपि चॅनल चे आज १० लाख सबस्क्राईबर आहेत. मधुरा बाचल ह्यांच्या ह्या प्रवासात त्यांचे पती मंगेश बाचल ह्यांनी सुद्धा त्याच्या ह्या खडतर प्रवासात त्यांची मदत केली. मंगेश बाचल स्वतः व्हिडिओ शूट आणि एडिट करायचे. सध्या त्यांची आता एक टीम आहे त्या टीमसोबत त्या काम करतात.दोन मुलांना सांभाळून त्या त्यांचं काम व्हिडीओ शूट करणं. अपलोड कारण हे काम यशस्वीरीत्या करतात. आणि अश्या रीतीने त्या Successful Business( Madhura Bachal Success Story) वूमन आहे.

मित्रांनो Madhura Bachal Success Story आमचा हा ब्लॉग तुम्हांला कसा वाटला comment करुन नक्की सांगा.

 

Read Also – बिग बॉस 17 सर्वात मोठं एलिमिनेशन ट्विस्ट 5 जण जाणार शो मधून बाहेर नवीन स्पर्धकांची एन्ट्री

 

 

 

Share This Article