Lakshadweep Tour – लक्षद्वीपला कस जायचं ? लक्षद्वीपला कोणकोणते आयलँड फेमस आहेत ?

Priyanka
5 Min Read

Lakshadweep Tour – मागील आठवड्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतातील हा छोटासा केंद्रशासित प्रदेश चांगला चर्चेत गाजला आहे. नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप येथील जागेच्या सौंदर्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. तेव्हापासून गूगलवर लक्षद्वीप टूर ट्रेंड होत आहे. आणि लोक लक्षद्वीप सर्च करत आहे. जर तुम्ही लक्षद्वीपला जायचा विचार करत आहात.

तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता.आज आपण या  ब्लॉग मध्ये पाहणार आहोत लक्षद्वीपला कसे जायचे कोणकोणत्या मार्गाने लक्षद्वीपला जाऊ शकता तिथे कोणकोणते आयलंड फेमस आहेत.लक्षद्वीप हा आपल्या भारताचा एक भाग आहे.

लक्षद्वीप भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. या केंद्रशासित प्रदेशात ३६ आयलॅंड (द्वीप) आहेत लक्षद्वीप आपल्या भारताचा एक Union Territory चा एक भाग आहे. त्यासाठी तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी परमिट काढावं लागत. चला तर पाहूया Lakshadweep Tour – लक्षद्वीपला कस जायचं ? लक्षद्वीपला कोणकोणते आयलँड फेमस आहेत ? 

Lakshadweep Tour – लक्षद्वीपला जाण्यासाठी परमिट कसे काढावे ?

मित्रांनो जर तुम्ही फिरायला जाण्यासाठी Lakshadweep Tour प्लान करत आहात तर तुम्हांला तिथे जाण्यासाठी त्या ठिकाणचा परमिट काढावा लागणार आणि हा परमिट तुम्हांला लक्षद्वीपच्या ऑफिशियल वेबसाइट उपलब्ध होईल. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हांला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.अर्ज भरुन झाल्यानंतर टूरच्या पंधरा दिवस आधी ई-मेल वरुन परमिट मिळू शकत.

Lakshadweep Tour

लक्षद्वीपला जाण्यासाठी तुम्हांला त्याठिकाणाचा परमिट काढावा लागेल  हा परमिट तुम्हांला केरळ मध्ये असणाऱ्या  कोच्ची शहरमध्ये Lakshadweep Administrator office आहे येथून सुद्धा तुम्हांला लक्षद्वीप जाण्याचं परमिट मिळेल. लक्षद्वीपच्या ऑफिसला स्पॉट ऑफिस सुद्धा म्हटलं जात. लक्षद्वीपच्या ऑफिसला स्पॉट ऑफिस सुद्धा म्हटलं जात. मिंत्रानो जर तुम्ही लक्षद्वीप जायचा प्लॅन करत आहात. तर सर्वात पाहिलं तुम्हांला परमिट काढावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हांला तिकीट बुक कराव्या लागतील.

Lakshadweep Tour – लक्षद्वीपला कसं जायचं ?

मित्रांनो तुम्ही लक्षद्वीपला २ मार्गानी जाऊ शकता त्यात एक आहे हवाई मार्ग (Flight )आणि दुसरा जल मार्ग (Cruise) या दोन मार्गानी तुम्ही लक्षद्वीपला जाऊ शकता. लक्षद्वीपला जात असाल आणि तुम्हांला लवकर जायचं असेल तर हवाई मार्ग म्हणजेच Flight ने तुम्ही लवकर जाऊ शकता.

हवाई मार्ग (Flight ) – मित्रांनो लक्षद्वीपला जाण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हांला केरळमध्ये असणाऱ्या कोच्ची शहराच्या विमानतळापर्यंत फ्लाईटची तिकीट बुक करावी लागणार. कोच्ची जाण्यासाठी तुम्हांला मुंबई, दिल्ली अश्या मोठया विमानतळावरून फ्लाईट मिळू शकेल. कोच्ची पोहचल्या नंतर तुम्हांला लक्षद्वीप जाण्यासाठी Agatti Airport पर्यंतची तिकीट बुक करावी लागणार. अगति एरपोट पोहचल्यावर बोट किंवा जहाजाद्वारे तुम्ही लक्षद्वीपच्या वेगवेगळ्या आयलँड वर जाऊ शकता.

जल मार्ग (Cruise) – मित्रांनो तुम्ही लक्षद्वीपला जहाजाने सुद्धा जाऊ शकता जहाजाने जाण्यासाठी तुम्हांलापहिल्यांदा कोच्चीला जावं लागेल. कोच्चीला गेल्यावर तुम्हांला तेथून जलमार्गाद्वारे लक्षद्वीपला जावं लागेल. जहाजावरुन कोच्ची पोहचण्यासाठी तुम्हांला १५-१८ तास लागतील. तिथून तुम्ही बोट किंवा जहाजाने लक्षद्वीपला जाऊ शकता.

मित्रांनो तुम्ही लक्षद्वीपला जहाजाने सुद्धा जाऊ शकता जहाजाने जाण्यासाठी तुम्हांलापहिल्यांदा कोच्चीला जावं लागेल. कोच्चीला गेल्यावर तुम्हांला तेथून जलमार्गाद्वारे लक्षद्वीपला जावं लागेल. जहाजावरुन कोच्ची पोहचण्यासाठी तुम्हांला १५-१८ तास लागतील. तिथून तुम्ही बोट, जहाज किंवा फ्लाईटने  लक्षद्वीपला जाऊ शकता.

Lakshadweep Tour – लक्षद्वीपला कोणकोणते आयलँड फेमस आहेत ?

Lakshadweep Tour

लक्षद्वीप भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपमध्ये एकूण ३६ आयलँड आहेत.या ३६ आयलँड पैकी सर्वात जास्त फेमस आयलँड Kadmat Island, Kalpeni Island, Minicoy Island, Kilthan Island, Agatti Island, Pitti Island   हे काही आयलँड जे लक्षद्वीपला फेमस आहेत. ह्या आयलँडवर खूप साफ स्वछ पाणी सुंदर रम्य वातावरण, स्वछ परिसर पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही वॉटर ऍक्टिव्हिटी सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही Scuba Diving सुद्धा करु शकता.

Lakshadweep Tour

मित्रांनो तुम्ही लक्षद्वीप जाण्याचा प्लॅन करत आहात तर कमीत कमी ४-५ दिवसाचा राहण्याचा प्लॅन केला पाहिजे. लक्षद्वीपला जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पन्नास ते एक(50,000-1,00,000) लाखाचा कारच येईल. जर तुम्ही ४-५ दिवसाचा राहण्याचा प्लॅन कराल तर तुम्हांला पूर्ण लक्षद्वीप पाहायला फिरायला मिळेल.

हि बातमी पण वाचा :

६२ व्या वर्षी एका महिलेने दूध डेरीचा बिझनेस सुरु करुन उभी केली करोडीची कंपनी – Navalben Choudhary Success Story

Business ideas under 10000 – फक्त १०,००० रुपयात सुरु करा हे व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

Share This Article