Elvish Yadav Thappad video – मला कोणत्याही गोष्टीचा पच्छाताप नाही मी असाच आहे म्हणत एलव्हीश यादवने मारली एका व्यक्तीच्या कानाखाली

Priyanka
3 Min Read

Elvish Yadav Thappad Video – बिग बॉस ओटीटी  २ चा विजेता एलव्हीश यादव यांचा सध्या एक विडिओ खूप व्हायरल होतोय. एल्विस यादव सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहेत. रविवारी रात्री जयपूर मधील एका रेस्टोरंट मध्ये त्याने एका माणसावर हात उचलला. अशी बातमी सगळ्या न्युज चॅनेलवर होत आहे. त्यांचा एक  व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला तर पाहूया Elvish Yadav Viral Video नक्की काय आहे.

Elvish Yadav Thappad Video

बिग बॉस ओटीटी विजेता एल्विस यादव यांचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. त्या व्हीडीओ मध्ये तो खूप रागात दिसत आहे.आणि कोणावर तरी हात उचलताना सुद्धा दिसत आहे. आणि त्यांचा राग शांत झाला नाही तर तो परत त्याच्यावर हात उचलायला जातो पण तेवढ्यात त्याचे मित्र त्याला थांबवतात. त्याच्यासोबाबत काही पोलिसही होते ते हि त्याला थांबवण्याच्या प्रयत्न करत होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच जास्त चर्चेचा विषय बनला आहे.

एलव्हीश यादवने आपल्या बचावामध्ये काय उत्तर दिले – Elvish Yadav Thappad Video

एल्विस यादव यांचा कोणाला तरी मारतानाच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आणि त्यानंतर आपल्या बचावा मध्ये त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला त्या व्हिडिओ मध्ये ते म्हणतात कि मी नेहमी सारखा फिरत होतो माझे फॅन्स माझ्यासोबत सेल्फी घेत होते आणि ते मी त्यांना घेऊ हि देत होतो.

पण माझ्या पाठी कोणी काही चुकीचं करत असेल तर मी त्याला सोडणार नाही तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहू शकता माझ्यासोबत पोलीस आणि कमांडो सुद्धा होते आणि काहीही चुकीचं काम झालं नाही आहे. आणि हा माझा वैयक्तिक प्रश्न होता. त्या माणसाने काही चुकीचे अपशब्द वापरले आणि त्या त्यावर मी त्याच प्रतिउत्तर दिले. मला कोणत्याही गोष्टीचा पच्छाताप नाही आहे त्याने मला शिवी दिली आणि मी माझ्या पद्धतीने त्याला उत्तर दिल.

एलव्हीश यादव कोण आहे – Who is Elvish Yadav ?

एलव्हीश हा एक यूट्यूब आणि सोशल  मीडियावर असणारा खूप फेमस चेहरा आहे. एलव्हीश यादव हा मूळचा राहणार गुरुग्रामच आहे. त्याच वय २५ आहे. त्याने त्याच शिक्षण दिल्ली मधील हंसराज कॉलेज मधून पूर्ण केलं. एलव्हीश यादव यांचं elvish Yadav vlog नावाचं फेमस यूट्यूब चॅनल आहे. आणि युट्युब वर शॉर्ट फिल्म सुद्धा बनवतो. एलव्हीश यादव युट्युबच्या माध्यमांमधून लाखो करोडो रुपये कमवतात. एलव्हीश यादवने  बिग बॉस ओटीटी २ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री केली होती आणि तो बिग बॉस ओटीटी २ चा विजेता सुद्धा ठरला आहे.

हि बातमी पण वाचा :

Poonam Pandey Death Fake News – पूनम पांडे विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल स्वतःच्या मरणाची खोटी अफवा पसरवणे पडले महागात

 

Share This Article