Big Boss 17 Winner – मुनावर फारुकी बनला बिग बॉस 17 चा विजेता ट्रॉफी सोबत मिळाले लाखो रुपये आणि Hyundai Creta 2024

Priyanka
3 Min Read

Big Boss 17 Winner – बिग बॉस १७ ग्रँड फायनल एपिसोड खूप जबरदस्तरित्या संपला. सलमान खान बिग बॉस खूप जबरदस्त पाने होस्ट करतात. २८ जानेवारी २०१४ बिग बॉस १७ चा शेवटचा दिवस होता बिग बॉस १७ चा सीजन मुनावर फारुकी जिंकला. बिग बॉस १७ सिजनचा तो विनर ठरला. २८ जानेवारीला मुनावर फारुकीचा वाढदिवस होता  तो दिवस त्याच्यासाठी खूप खास होता. आणि त्याच दिवशी तो हि बिग बॉस  १७ ची ट्रॉफी जिंकला. हा वाढदिवस त्याचा एक अविस्मरणीय आठवण राहील.

मुनावर फारुकी बनला बिग बॉस १७ चा विनर – Big Boss 17 Winner

मुनावर फारुकी हे नाव सोशल मीडियावर यूट्यूब, इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. आणि जेव्हा पासून बिग बॉस १७ मध्ये एन्ट्री केली तेव्हा पासूनच मुनावर फारुकी नाव खूप चर्चेत आहे. ज्याप्रमाणे तो बिग बॉस १७ मध्ये खेळत होता. त्याचा खेळ पाहून प्रेक्षक खूप खुश होते. प्रेक्षकांना त्याचा खेळ खूप आवडत होता. 

बिग बॉस १७ च्या टॉप ५ मध्ये अंकिता लोखंडे, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी आणि अरुण महाशेट्टी हे पंच जण टॉप ५ मध्ये होते. मुनावर फारुकीच्या भरभरून वोट केल्यामुळे आज सगळ्यांना हरवून मुनावर फारुकी बिग बॉस १७ (Big Boss 17 Winner)चा विजेता झाला.

मुनावर फारुकी रिऍलिटी शो – Big Boss 17 Winner

मुनावर एक कॉमेडियन आणि रॅपर आहे. त्याच्या Standup Comedy मुळे सोशल मीडियावर तो खूप फेमस आहे. मुनावर फारुकी ह्या अगोदर लॉक-अप ( Lock -Up ) रिऍलिटी शो चा विजेता ठरला आहे. लॉकअप रिऍलिटी शो जीतल्यामुळे खूप जास्त चर्चेत होता. तिथे त्याला त्याच्या फॅन्सने भरभरून प्रेम दिल. आणि इथे सुद्धा त्याच्या फॅन्सच्या वोटमुळे आणि प्रेमामुळे आता तो बिग बॉस १७ रिऍलिटी शो चा विजेता ठरला आहे 

कोण आहे  मुनावर फारुकी – Who is Munawar Faruqui

मुनावर फारुकी एक इंडियन Youtuber, Stand-Up Comedian आणि Lockup रिऍलिटी शो चा विजेता आहे आणि आता तो बिग बॉस १७ सुद्धा विजेता ठरला आहे. मुनावर फारुकीचे यूट्यूबवर ४. ६४ मिलियन फॉलोवर्स आहेत. आणि इंस्टाग्रामवर १० मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. बिग बॉस १७ चा विजेता कोण होणार सोशल मीडियावर अशी चर्चा  रंगली होती आणि मुनावर फारुकी हे नाव जास्त चर्चेत होत. आणि शेवटी फॅन्सच्या वोटमुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे मुनावर फारुकी बिग बॉस १७ विजेता ठरला.

हि बातमी पण वाचा :

Munawar Faruqui Income – YouTube आणि Instagram वर कॉमेडी व्हिडिओ बनवून कमवतो लाखो रुपये

Share This Article