चिकू खाण्याचे गुणकारी फायदे – 7 Amazing benefits of eating sapota

Priyanka
5 Min Read

7 Amazing benefits of eating sapota चिकू हे एक तपकिरी रंगाचं फळ आहे. त्याची त्वचा उग्र स्वरूपाची आहे. हे फळ चवीला गोड आहे. चिकू हे फळ आतून दिसायला सुद्धा तपकिरी रंगाचे दिसते त्याच्या आत तपकिरी रंगाचा जाडसर लगदा आहे. ह्या फळात काळ्या रंगाच्या बिया असतात त्या बियांपासून निघणारे तेल हे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते.चिकू फळ आपल्याला कोणत्याही त्रुतु मध्ये सहज उपलब्ध होते.

चिकू ह्या फळात पाण्याची मात्रा तसेच प्रोटीन ,कार्बोहाड्रेट , फॅट्स , व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळतात.तसेच ह्यात लोह, फॉस्फरस काही प्रमाणात क्षार देखील आढळतात. व्हिटॅमिन ई ची मात्रा असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप लाभदायी आहे.

चिकू हे फळ पिकलेले खाणे केव्हाही शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते परंतु चिकू हे फळ कच्चे खाणे टाळावे कच्या चिकू चे सेवन केल्याने पोटात गॅस तयार होतो व पोट दुखू लागते. जाणून घ्या 7 Amazing benefits of eating sapota

शास्रीय नाव : मनिलकर झापोटा (Manilkara zapota)
इंग्रजी नाव : स्पॉडिला (Sapodilla)

7 Amazing benefits of eating sapota – चिकू खाण्याचे फायदे

१. कॅन्सर बचाव

चिकू ह्या फळात फायबर आणि अँटिऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपला कॅन्सर सारख्या रोगापासून बचाव होतो. ह्यात व्हिटॅमिन बी व व्हिटॅमिन ए देखील भरपुर प्रमाणात आहे ह्यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे आपल्याला तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

२. मानसिक आरोग्य चांगले राहते

चिकू ह्या फळाचे सेवन केल्याने आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. ह्या फळाच्या सेवनाने शरीरातील थकवा व मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.ज्यांना झोपेचा त्रास आहे किंवा कोणत्यातरी चिंतेनेग्रस्त असलेल्या पीडित लोकांना चिकू ह्या फळाच्या सेवनाने आराम मिळतो.

३. डोळ्यांसाठी फायदेशीर

चिकू हे फळ आपल्या डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे ह्यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांची बघण्याची शक्ती वाढते.तसेच वयस्कर लोकांना होणारे आजार मोतियाबिंदू व रातांधळेपणा सारख्या होणाऱ्या समस्या कमी होतात.

४. गरोदर महिलांसाठी फायदेशीर

कॅल्शियम ,आयरन, फॉस्फरस ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. (7 Amazing benefits of eating sapota) गर्भावस्थेत लागणारे कार्बोहैड्रेट ह्या फळात असल्यामुळे व तसेच गरोदरपणात उलट्या होणे, चक्कर येणे, मन चलबिल होणे या सारख्या समस्यांवर आराम मिळतो. त्यामुळे चिकू या फळाचे सेवन करणे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे.

५. रोग प्रतिकारकशक्ती वाढवते

ह्यामध्ये अँटिऑक्सिडेन्ट,व्हिटॅमिन सी, अँटिव्हयरल आणि अँटीबॅकटेरियल गुण असल्यामुळे आपल्या शरीरात पसरणारे व्हायरस आणि विषाणूंना नष्ट करतात. ह्यात असणारे पोटॅशियम, आयरन आणि फोलेट आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.चिकू मध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

६. हाडांसाठी फायदेशीर

चिकूमध्ये कॅल्शियम , आयरन आणि फॉसफरस भरपूर प्रमाणात आहेत जे आपल्या हाडांसाठी खूप आवश्यक आहे. ह्यात असणाऱ्या कॅल्शियम,फॉसफरस आणि आयरन मुळे आपल्या हाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. व आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे चिकू ह्या फळाचे सेवन करणे आपल्याला खूप लाभदायी आहे.

७. ऊर्जा मिळते

जे लोक रोज व्यायाम करतात त्याने ऊर्जेची खूप आवश्यकता असते त्यामुळे अश्या लोकांनी रोज एक चिकू खाणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल कारण चिकूमध्ये ग्लुकोज मात्रा असल्यामुळे ते आपल्या शरीराला लवकर ऊर्जा मिळवून देतात.

7 Amazing benefits of eating sapota and healthy nutrients – चिकू फळात असणारे आरोग्यदायी पोषकतत्वे

7 Amazing benefits of eating sapota

Flickr

खनिजे(Minerals) जीवनसत्व(Vitamins)
सोडियम : ०% व्हिटॅमिन ए : १%
पोटँशियम : ५% व्हिटॅमिन सी : २४%
मॅंग्नेशियम : ३ % व्हिटॅमिन बी ६ : ०%
कोबालमिन : ०%
आयरन : ४%

 

चिकू आणि किवी ह्या फळात काय साम्य आहे ?

चिकू आणि किवी हे दोन्ही फळ साधरणतः दिसायला एक सारखे आहे. ह्या दोन्ही फळांची बाहेरची त्वचा सारखी दिसते . फक्त किवी हे आतून हिरव्या रंगाचे दिसते आणि त्याच्या आत लहान बारीक बारीक बिया असतात ज्या आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि चिकू आतून तपकिरी रंगाचे दिसते आणि ह्यात देखील काळ्या रंगाच्या आकाराने थोड्या मोठे बिया असतात . चिकू ह्या फळाच्या बियांपासून बनणारे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते .

घरगुती उपाय

१. 7 Amazing benefits of eating sapota केसातील कोंडा घालवण्यासाठी चिकूंच्या बियांची पेस्ट बनवा त्यात एरंडी तेल मिक्स करा हे मिश्रण केसांच्या त्वचेवर लावा आणि केस दुसऱ्यादिवशी सध्या पाण्याने धुवून काढा त्यामुळे आपल्या केसांतील कोंडा निघून जाईल आणि केस चमकदार होतील.

Read Also

जाणून घ्या पपई कधी खावी पपई खाण्याचे फायदे आणि काही घरघुती उपाय

मित्रांनो तुम्हांला आमचा चिकू खाण्याचे गुणकारी फायदे – 7 Amazing benefits of eating sapota हा ब्लॉग कसा वाटला comment करून नक्की सांगा

Share This Article